- आझाद मैदानात आंदोलन करण्यास पोलिसांकडून मनाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ जानेवारी २०२४) :- मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लाखोंच्या संख्येनं मोर्चेकरी राजधानी मुंबईच्या दिशेनं मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली कूच करत आहेत.
मनोज जरांगे-पाटील २६ जानेवारीपासून आझाद मैदान आंदोलन करणार आहेत. पण, आझाद मैदानात आंदोलन करण्यास मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. आंदोलनासाठी पोलिसांनी खारघर येथील मैदान सुचवलं आहे.
दरम्यान, मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे यांना नोटीस पाठवली आहे. मुंबईत होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही नोटीस देण्यात आली आहे. तसेच, मराठा आंदोलनामुळे विपरित परिणाम होऊन मुंबईची दैनंदिन वाहतूक व्यवस्था कोलमडेल असं नोटीसमध्ये म्हटलं आहे. आंदोलकांची संख्या लक्षात घेता मुंबईत आंदोलकांना जागा पुरेल एवढे मोठे एकही मैदान नाही, त्यामुळे आंदोलन करण्यासाठी खारघरमधील इंटरनॅशनल कॉर्पोरेशन पार्क मैदान संयुक्तिक राहील असे पोलिसांकडून नोटीसमध्ये सांगण्यात आले आहेत.













