न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ जानेवारी २०२४) :- भारताच्या ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेच्यावतीने पिंपरी येथील महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा समारंभ संपन्न झाला
ध्वजारोहण समारंभापुर्वी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन करण्यात आले. या सोहळ्यासाठी आमदार उमा खापरे, अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, उल्हास जगताप आणि महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक उपस्थित होते











