न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ जानेवारी २०२४) :- श्रीमती लक्ष्मीबाई तापकीर माध्यमिक विद्यालय व एल बी टी इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये भारताचा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. बाबा स्वामी योगगुरू सुरेश विटकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्ति पर नृत्य सादर केले. तसेच विद्यार्थ्यांनी भाषणे करून क्रांतिकारकांना आदरांजली व्यक्त केली.
यावेळी संस्थेचे सचिव सागर तापकीर हे उपस्थित होते.तसेच संचालक मोहन तापकीर, संचालक राजूशेठ पवार, शांताराम बोंगाळे, अशोक हजारे, प्रकाश मुरकुटे, राजकुमार हैबतपुरे,दत्तात्रय काटे, एकनाथ काटे, अविनाश चव्हाणके, अनिल तोडकर , राजाराम पवार, शंकर खेडेकर, सिध्देश्वर केदारकुंठे, रामकिशन वढणे, सुरेश पाटील, नंदकिशोर गिरमे, चंद्रकांत कुंभार, शकर बिरादार, सुधाकर भाकरे, दिलीप वढणे, दत्तात्रय भुजबळ, वीरेंद्र यादव, विजय पत्तार इत्यादी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संयोजन मुख्याध्यापक शशिकांत वाखारे,व मुख्याध्यापिका कोयल सातपुते यांनी केले.तसेच सूत्रसंचलन बापू बल्लाळ व माधुरी केदारी यांनी केले.