न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ जानेवारी २०२४) :- देहुतील घेनंद कुटुंबीय आपल्या कुटुंबासोबत रायगड पाहण्यासाठी गेले होते. त्यांना रोपवे चे तिकीट मिळाले नाही. म्हणून पायी जाण्याचा निर्णय घेतला. खर तर लहान मुलगी अगदी ९ महिन्याची त्यांची मुलगी तिला घेऊन एवढा प्रवास कसा करायचा हा पेच त्यांच्या समोर उभा राहिला. पण सुरुवातीला पहिल्या पायरीवर कन्येनं डोकं टेकवले आणि गड चालायला तिच्या वडिलांसोबत त्यांच्या खांद्यावर बसून सुरुवात केली.
अस वाटलं हे मुलगी वाटेत झोपणार पण सुरुवातीपासून शेवटपर्यंत ती एकदाही रडली नाही,एक क्षण भर देखील झोपली नाही किंवा तिने कसलाही त्रास दिला नाही. वाटेत अनेक पर्यटक भेटत होते प्रत्येक जन तिचे कौतुक करत होते. एवढी छान मुलगी गडावर अगदी ९ व्या महिन्यात येते ते तिचे भाग्य आहे.
प्रत्येक जण तिच्या सोबत सेल्फी काढत होते, फोटो काढत होते. वरती गडावर पोहचल्यावर सर्वांनी राजांच्या समाधीचे दर्शन घेतले. पुन्हा खाली येई पर्यंत या कन्येनं डोळे बंद केले नाही हसत हसत खाली गड चढली हसत हसत गड खाली उतरली. वाटेत तिचे शिवभक्तांच्या वतीने कौतुकही केले.
वयाच्या ९ व्या महिन्यात न रडता न थांबता खांद्यावर बसून रायगड











