- महिलेला घातला एकोणीस लाखांना गंडा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ जानेवारी २०२४) :- तैवानमध्ये काही पार्सल पाठविले आहे, ते पार्सल मुंबई नार्कोटीक्स डिपार्टमेंट यांनी पकडले असुन, त्याचे व्हेरीफिकेशन करण्यासाठी मुंबई नार्कोटीक्स डिपार्टमेंटला कॉल जोडल्याचे आरोपी क्र १ याने फिर्यादीला मोबाईलवर कॉल करुन सांगितले. महिला आरोपी क्र २ हिचेशी कॉल जोडुन तीने फिर्यादीला त्यांचे बँक खाते चेक करायचे आहे. त्यासाठी स्काईप अॅप्लीकेशन डाऊनलोड करण्यास सांगुन त्याचा आयडी देऊन त्यावर मेसेज करण्यास सांगितला. त्या अॅपद्वारे व्हिडीओ कॉल करुन फिर्यादीचे आधार कार्ड व्हिडीओ कॉलवरुन पाहुन, आयसीआयसीआय बँकेचे अॅप चालु करण्यास सांगुन त्यामधुन फिर्यादीचे मोबाईलमधील आयसीआयसीआय बँकेच्या खात्याची पूर्ण माहिती घेऊन व्हिडीओ कॉल चालु ठेऊन फिर्यादीच्या मोबाईल अॅपमध्ये त्यांच्या नकळत बेनिफिशरी अॅड करुन त्यादरम्यान फिर्यादीच्या बँक खात्यावर १९,०४,१०१ रुपयाची रक्कम पर्सनल लोन म्हणुन मंजुर करुन घेतली.
ती रक्कम फिर्यादीच्या बँक खात्यावर ट्रान्सफर करुन घेतली व ती रक्कम त्यांच्या बँक अकाऊंटला आरोपी क्र ३ च्या खात्यावर आरटीजीएस, एनईएफटीद्वारे ट्रान्सफर करण्यास सांगुन १९,०४,१०१ रुपयाची रक्कम बेनिफिशरीचे अकाऊंटवर ट्रान्सफर करुन घेतली. ती रक्कम स्वतःच्या आर्थिक फायदयासाठी फिर्यादीकडुन ट्रान्सफर करुन घेऊन व तीचा स्वतःच्या फायदयाकरीता वापर करुन फिर्यादीची आर्थिक फसवणुक केली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि. १९) रोजी वाकड येथे फोनद्वारे घडली. महिला फिर्यादीने आरोपी १) मोबाईलवरील इसम आकाश कुमार, २) अमनी कोंडाल, ३) बेनिफिशरी म्हणुन अॅड झालेले सीआरबीव्ही असे नाव असलेल्या खात्याचा वापरकर्ता यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे.
वाकड पोलिसांनी ९१/२०२४ भा.दं.वि कलम ४०६, ४१९, ४२०, ३४ सह माहीती तंत्रज्ञान अधिनियम (सुधारीत) कायदा २००८ चे कलम ६६ (सी) ६६ (डी) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोनि गुन्हे साळुंखे पुढील तपास करीत आहेत.















