पोलीस निरीक्षकांच्या इतरत्र बदल्या; सत्तावीस गेले चोवीस आले..
चोवीसमधील एकवीस पोलीस निरीक्षक थेट नागपूरहून शहरात दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ जानेवारी २०२४) :- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील तब्बल २७ पोलीस निरीक्षकांच्या राज्यात इतरत्र ठिकाणी बदल्या करण्यात आल्या आहेत. तर, राज्यातील इतर ठिकाणच्या चोवीस पोलीस निरीक्षकांच्या पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक (आस्थापना) के एम मल्लिकार्जुन प्रसन्ना यांनी मंगळवारी (दि. ३०) रोजी बदलीचे आदेश काढेल आहेत.
यात पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील अजित लकडे यांची सोलापूर शहर, शिवाजी गवारे यांची ठाणे शहर, सुनील गोडसे यांची नागपूर शहर, शंकर डामसे यांची ठाणे शहर, शैलेश गायकवाड यांची नागपूर शहर, दिलीप शिंदे यांची सोलापूर शहर, शंकर बाबर यांची ठाणे शहर, ज्ञानेश्वर साबळे यांची ठाणे शहर, रणजीत सावंत यांची नागपूर शहर, दिपाली धाडगे यांची नागपूर शहर, प्रसाद गोकुळे यांची नागपूर शहर, सुनील पिंजन यांची नागपूर शहर, रामचंद्र घाडगे यांची नागपूर शहर, विश्वजीत खुळे यांची नागपूर शहर, मच्छिंद्र पंडित यांची नागपूर शहर, बाळकृष्ण सावंत यांची नागपूर शहर, प्रकाश जाधव यांची नागपूर शहर, दीपक साळुंखे यांची ठाणे शहर, शहाजी पवार यांची सोलापूर शहर, किशोर पाटील यांची नागपूर शहर, सुनील तांबे यांची ठाणे शहर, रूपाली बोबडे यांची नागपूर शहर, अरविंद पवार यांची नागपूर शहर, युनूस मुलानी यांची नागपूर शहर, अनिल देवडे यांची छत्रपती संभाजी नगर शहर, दशरथ वाघमोडे यांची गडचिरोली, सोन्याबापू देशमुख यांची नागपूर शहर येथे बदली करण्यात आली आहे.
दरम्यान पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात अमोल फडतरे डीआयजी गडचिरोली येथून, संदीप पाटील गडचिरोली येथून, वैजयंती मांडवधरे नागपूर शहर येथून, विश्वनाथ चव्हाण नागपूर शहर येथून, विनोद चौधरी नागपूर शहर येथून, बापू ढेरे नागपूर शहर येथून, दीपक गोसावी नागपूर शहर येथून, प्रवीण कांबळे नागपूर शहर येथून, प्रदीप राईनवर नागपूर शहर येथून, अमित डोळस नागपूर शहर येथून, संग्राम शेवाळे नागपूर शहर येथून, अमोल देशमुख नागपूर शहर येथून, राजेंद्रकुमार सानप नागपूर शहर येथून, गणेश जामदार नागपूर शहर येथून, नितीन फटांगरे नागपूर शहर येथून, बबन येडगे नागपूर शहर येथून, भारत शिंदे नागपूर शहर येथून, ऋषिकेश घाडगे नागपूर शहर येथून, भीमा नारके नागपूर शहर येथून, भारत कराडे नागपूर शहर येथून, गोरख कुंभार नागपूर शहर येथून, विजयकुमार वाकसे अमरावती शहर येथून, मालोजी शिंदे ठाणे शहर येथून, धनंजय कापरे ठाणे शहर येथून बदली करण्यात आली आहे.











