- ‘एक मराठा लाख मराठा’ च्या घोषणेने परिसर दणाणला…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ जानेवारी २०२४) :- मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला मोठं यश आल्यानंतर त्यांनी परतीचा प्रवास सुरु केला आहे. मनोज जरांगे पाटील आज बुधवारी (दि. ३१) रोजी दुपारी एकच्या सुमारास भोसरीतील पीएमटी चौकात आले होते.
चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास त्यांनी अभिवादन केले. त्यावेळी मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक आणि तरुण तसेच जरांगे पाटलांना पाहण्यासाठी, त्यांच्यासोबत सेल्फी आणि फोटो काढण्यासाठी चौकात मोठी गर्दी उसळली होती. त्यामुळे चौकात काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती.
पोलिसांचा फौजफाटाही तिथे उपस्थित होता. त्यांनी वाहतूक कोडी सोडवून रस्ता मोकळा करून दिला. उपस्थितांच्या ‘एक मराठा लाख मराठा’ या घोषणेने परिसर दणाणून गेला होता. त्यानंतर मनोज जरांगे पाटलांचा ताफा दुपारी दीडच्या सुमारास पुण्याकडे मार्गस्थ झाला.











