- कोअर कमिटी अध्यक्षपदी संदीप गव्हाणे तर, सरचिटणीसपदी परशुराम कदम…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ फेब्रुवारी २०२४) :- महाराष्ट्र राज्य शासकीय निमशासकीय लिपीक संवर्गीय हक्क परिषदेची पिंपरी चिंचवड शहर कोअर कमिटी (मार्गदर्शक) परिषदेचे प्रदेशाध्यक्ष विजय बोरसे , प्रदेश सरचिटणीस उमाकांत सुर्यवंशी व प्रदेश संघटक शिवाजी खांडेकर यांच्या आदेशाने परिषदेचे शहर अध्यक्ष संजय जगदाळे यांनी लिपीक हक्क परिषदेच्या विवीध पदाधिकाऱ्यांच्या नियक्त्या घोषीत केल्या आहेत.
संपुर्ण राज्यभरात व्याप्ती व लिपीक वर्गाची सर्वात मोठी संघटना असलेल्या महाराष्ट्र राज्य शासकीय निमशासकीय लिपीक संवर्गीय हक्क परिषदेची शहरातील कार्यकारणीची निवड नुकताच करण्यात आली असून, कोअर कमिटीच्या अध्यक्षपदी संदीप गव्हाणे यांची तर शहर सरचिटणीसपदी परशुराम कदम यांची निवड करण्यात आली आहे.
या बरोबरच राजेंद्र वाकोडे (उपाध्यक्ष), निखील काळजे (कार्याध्यक्ष), इस्माईल शेख (कोषाध्यक्ष),स्वप्निल भालेराव (प्रवक्ता), संजय घुले (प्रसिद्दी प्रमुख), सिध्देश्र्वर वेदपाठक (सह-कार्याध्यक्ष),अनिल वाळंज (चिटणीस), माया वाकडे (महिला संघटक), रेखा कुऱ्हाडे (महिला संघटक), शंतनु कांबळे (संघटक), प्रकाश निकाळजे (समन्वयक), धिरज बोहत (समन्वयक), विशाल डाबेराव (समन्वयक), रमेश खाडे (समन्वयक) यांची निवड झाली आहे. तसेच परिषदेच्या कोअर कमिटीच्या सदस्यपदी बाळासाहेब तुंगे (सदस्य), डॉ. धनंजय पाटील (सदस्य), रविराज राठोड (सदस्य), शशिकांत जाधव (शहर अध्यक्ष, शिक्षकेतर कर्मचारी संघटना, पिं. चि) यांच्या नियुक्त्या झाल्या आहेत.
पिंपरी चिंचवड शहरातील शासकीय, निमशासकीय विभागातील हजारो लिपीक, मुख्य लिपीक, कार्यालयीन अधिक्षक व प्रशासन अधिकारी या सर्व लिपीक संवर्गातील कर्मचारी अधिकारी यांचे प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी परिषद कटीबध्द असून सर्व नवनियुक्त पदाधिकारी हे आपली जबाबदारी समर्थपणे पेलून लिपीक सवंर्गाच्या हितासाठी पुर्ण योगदान देतील, असा परिषदेचे शहराध्यक्ष संजय जगदाळे यांनी विश्वास व्यक्त केला आहे.











