- शहराध्यक्षपदी मीनाताई जावळे यांना संधी..
- विद्यमान अध्यक्ष चेतन बेंद्रे यांच्यावर राज्याच्या पदवीधरची जबाबदारी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ फेब्रुवारी २०२४) :- मीनाताई चंद्रमनी जावळे यांची आपच्या पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. विद्यमान अध्यक्ष चेतन गौतम बेंद्रे यांची आम आदमी पार्टीच्या पदवीधर आघाडी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रभारी गोपाल भाई इटालिया व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अजित फाटके यांच्या आदेशानुसार दोघांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
मीनाताई जावळे यांनी महिला बचत गटाच्या माध्यमातून शहरात मोठे जाळे पसरवले आहे. आम आदमी पार्टीची सामान्य कार्यकर्ता म्हणून प्रामाणिकपणे काम करत असताना पिंपरी चिंचवडसारख्या शहराध्यक्षपदी एका महिलेला संधी देऊन पार्टीने एक नवा पायंडा पाडला असून, महिला शक्तीच्या जोरावर पिंपरी चिंचवड मध्ये आम आदमी पार्टीचा महापौर निवडून आणू, असा विश्वास नवनियुक्त शहराध्यक्ष मीनाताई जावळे यांनी व्यक्त केला.
तर, पदवीधर राज्य आघाडीच्या नवीन जबाबदारीबाबत आभार व्यक्त करताना चेतन बेंद्रे म्हणाले, पदवीधर युवकांच्या बेरोजगारीच्या प्रश्नावर राज्यातील पदवीधरांचे संघटन करणार असून शासकीय भरतीमधील सरकारच्या गलथान कारभाराविरोधात आवाज उठवणार आहे.













