- आणखी निधी उपलब्ध करून द्या..
- सरपंच रणजित गाडेंची आ. मोहिते पाटलांकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ फेब्रुवारी २०२४) :- खेड तालुक्यातील तीर्थक्षेत्र येलवाडी गावातील विकासकामांसाठी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी पन्नास लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून, आणखी दीड कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता असल्याचे येलवाडी गावचे सरपंच रणजित गाडे यांनी सांगितले.
आमदार दिलीप मोहिते यांच्या उपलब्ध झालेल्या पन्नास लाख रुपयांच्या निधीतून रानूबाई मंदिर रस्ता, मोरे नर्सरी रस्ता, मैदान, येलवाडी कमान ते भंडारा डोंगराकडे जाणाऱ्या रस्ता आणि गावातील रस्त्याचे कामे सुरू करण्यात आले आहे.
येलवाडी ग्रामपंचायतीने गावातील रस्ते तसेच स्मशानभूमी, ग्रामवैभव ग्रामपंचायत तिर्थक्षेत्र येलवाडी आणि इतर विकासकामांसाठी दीड कोटीचा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्याकडे करण्यात आली होती. त्यानुसार, आमदार मोहिते पाटील यांनी पन्नास लाखांचा निधी दिला असून, गावातील विकासकामे करण्यासाठी आणखी एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी सरपंच रणजित गाडे यांनी केली आहे.