न्यूज पीसीएमसी नेटवर्क
तळेगाव (दि. ०४ फेब्रुवारी २०२४) :- रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी व साक्षी डायग्नोस्टिक्स हेल्थ केअर सोल्युशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन (दि. ८) रोजी सकाळी ९ ते सायं ६ वाजेपर्यंत करण्यात आले आहे, अशी माहिती रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीचे अध्यक्ष राहुल खळदे यांनी दिली.
तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशन, तळेगाव वाहतुक विभाग कार्यालय, वडगाव मावळ पोलिस स्टेशन, शिरगाव-परदवंडी पोलिस स्टेशन, तळेगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन व उत्पादन शुल्क विभाग कार्यालय यामधील सर्व वरिष्ठ पोलिस अधिकारी व पोलिस कर्मचाऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी या शिबिरात होणार आहे.