- वाकडच्या कस्पटेवस्तीतील घटना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ फेब्रुवारी २०२४) :- पंचासमक्ष निवासी नायब तहसिलदार, मुळशी (पौड), पुणे यांनी पोलीस बंदोबस्तामध्ये सदनिका सिलबंद करुन फिर्यादीच्या इंन्डोस्टार फायनान्सकडे तिचा ताबा दिला.
दरम्यान आरोपींनी फ्लॅटची सिलबंद कुलपे तोडुन, कुलपांचे नुकसान करुन फ्लॅटमध्ये अतिक्रमण केले आहे. हा प्रकार (दि. ०७) सकाळी ८.०० च्या सुमारास तनया अपार्टमेन्ट, कस्पटेवस्ती, वाकड येथे घडला. फिर्यादी संतोष कांतीलाल शिंदे यांनी आरोपी चांदसाहब हुसेन शेख व त्यांचे कुटुंबीय यांच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे.
वाकड पोलिसांनी १३३/२०२४, भा.द.वि.कलम ४४७,४२७, ३४. प्रमाणे आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांना सी.आर.पी.सी. ४१ (अ) (१) प्रमाणे नोटीस देण्यात आली आहे. सपोनि पवार पुढील तपास करीत आहेत.











