न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ फेब्रुवारी २०२४) :- आ. आण्णा बनसोडे (आमदार चषक) बुध्दिबळ स्पर्धा चिंचवडे लॉन्स, चिंचवड येथे रविवारी (दि. ४) रोजी उत्साहापूर्वक वातावरणात पार पडली. व्ही. पी. चेस अॅकेडमी आणि इंटरनॅशनल चेस प्लेअर वंदना पोतदार यांच्या वतीने आयोजित या स्पर्धेला ४०० हुन अधिक खेळाडुंनी प्रतिसाद देऊन स्पर्धा यशस्वी केली. स्पर्धा ७.९, १२, १५ वयोगटात व खुल्या गटामध्ये खेळवल्या. या स्पर्धेत रु.७५,००० रोख पारितोषिके व ४० करंडक प्रदान करण्यात आले.
या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ सेंट अँड्रुज प्रशालेचे प्राचार्य राजेश बनसोडे यांच्या हस्ते तर बक्षिस समारंभ पुणे जिल्हा बुध्दिबळ संघटनेचे सचिव राजेंद्र कोंडे, माजी महापौर मंगला कदम यांच्या हस्ते पार पडला. या प्रसंगी पिंपरी चिंचवड महानगर बुध्दिबळ संघटनेचे अध्यक्ष विवेक भागवत, महाराष्ट्र बुध्दिबळ संघटनेचे माजी सहसचिव अनिल राणे, व्ही. पि. चेस अॅकेडमीच्या संचालिका सौ. वंदना पोतदार, संचालक रविंद्र काळे, महेश मिस्त्रि, व्यंकट चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
गटनिहाय पारितोषिके मिळवलेले खेळाडू खालीलप्रमाणे :-
अ) खुला गट :- गौरव बाकलीवाल, श्लोक शरणार्थि, आदित्य जोशी, आशिष चौधरी, अलौकिक सिन्हा, ब) पुणे ग्रामीण-अनय सरपार्ट, क) महिला उत्कृष्ट – चतुधिं परदेशी, ड) सर्वोत्कृष्ट व्ही.पी.सी.ए. खेळाडू आयुष जयपिली (मुले), श्रेया सांगेपाग (मुली) अ) ९ वर्षाखालील गट – राघव पावडे, वेदांत कुलकर्णी, विहान शाह, ब) पुणे ग्रामीण – शौर्य भोंडवे, क) महिला उत्कृष्ट – साळवी चाकर, ड) सर्वोत्कृष्ट व्ही.पी.सी.ए. खेळाडू – पार्थ सोलापुरकर (मुले), ७ वर्षाखालील गट – शौर्या सोनवणे, इशान माधवरे, शोनिष गणपते, ब) महिला उत्कृष्ट – श्रीका महाजन, क) सर्वोत्कृष्ट व्ही.पी.सी.ए. खेळाडू – विराज कदम, ड) महिला खेळाडू उंडाळे श्रावणी, बिगरमानांकित गट – संदेश बजाज, ज्येष्ठ नागरिक खेळाडू विजेते – जोशी सुनिल, विकलांग खेळाडू विजेते – शिवसरण वासलिंग, पुणे ग्रामीण खेळाडू विजेते – अनुष्का कुतवळ, १५ वर्षाखालील गट – धवल लोंढे, कविज लिमये, विराज अग्निहोत्री, पुणे ग्रामीण :- आदित्य सातव, महिला उत्कृष्ट – खुशी यादव, सर्वोत्कृष्ट व्ही.पी.सी.ए. खेळाडू विर लोढा (मुले), सात्वीका शेट्टी (मुली) अ) १२ वर्षाखालील गट १) युग बार्डिया, २) लतिक राम, ३) शौर्य सुर्यवंशी











