- पोलिसांनी एका तासात घटनेचा लावला छडा; तरुण गजाआड…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ फेब्रुवारी २०२४) :- ऑनलाईन लोनचे घेतलेले पैसे परत करण्यासाठी दिघी परीसरातुन स्वतःचेच अपहरण झाल्याचा बनाव रचला. खंडणीसाठी खोटा कॉल केला. पोलिसांनी एका तासात घटनेचा छडा लावून खराडी, पुणे येथुन आरोपीला ताब्यात घेतले. दिघी पोलीस ठाणे तपास पथकाडुन व गुन्हे शाखा युनिट ०३ कडून बनाव उघड करुन आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विराज देशपांडे (वय २७ वर्षे) असे अटक आरोपीचे नाव आहे.
दिघीतुन सायंकाळी ६.३० च्या सुमारास तीन अज्ञात इसमांनी किडनॅप करुन पळवून नेले असुन पाच लाख रुपये खंडणी मागत आहे. तसेच पैसे न दिल्यास जिवे ठाणे मारण्याची धमकी दिली आहे, असा खोटा फोन आरोपीने केला. पोलीस तात्काळ अपहरण झालेल्या इसमाचा तसेच आरोपींचा शोध घेण्यासाठी रवाना झाले. मोबाईल नंबरचे तांत्रिक विष्लेशन करुन तपास पथकाने अपहरण झालेल्याचा शोध घेतला. तो खराडी, पुणे येथे मिळुन आला. घटनेबाबात चौकशी केली असता त्याने सुरवातीला उडवाडवीची उत्तरे दिली. तसेच त्याला कोठुन किडनॅप केले, अशी विचारणा केली असता त्याने प्रत्येक वेळी वेगवेगळी माहिती दिली. त्यास घटनास्थळावर नेले असता त्याने उपयुक्त माहिती दिली नाही. त्यानंतर त्याचेकडे सखोल चौकशी केली असता त्याने सांगितले कि “मी इन्टंट कॅश लोन या अॅपवरुन लोन घेतले तसेच लोन कंपणीचे लोक लोन साठी वारंवार फोन करुन लोनचे पैसे परत देण्यासाठी विचारणा करत होते. परंतु, त्यांचेकडे पैसे नसल्याने विराज देशपांडे व त्याचा मित्र राहुल कुमार हे विमाननगर येथे असताना त्यांनी घरच्यांकडुन लोनचे पैसे भरण्यासाठी खोटा कॉल करण्याचे ठरवले व विराज देशपांडे व राहुल कुमार यांनी पैशाची मागणी करण्यासाठी त्यांची बहिण यांना फोन करुन त्याचे किडनॅपिंग झाले असुन पाच लाख रुपये मागणी करत असल्याचे सांगितले व पैसे न दिल्यास जिवे मारणार असल्याचे सांगितले होते.” अशी माहिती पोलिसांना दिली.
अपहरण झालेला इसम विराज देशपांडे हा सुरक्षीत असुन त्याचे कोणत्याही प्रकारचे अपहरण झाले नसुन त्याने पोलीसांना खोटी माहिती दिल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्याच्याविरूध्द दिघी पोलीस ठाणे याठिकाणी अदखलपात्र गु. रजि नं. १९३/२०२४ भा. द. वि कलम १८२ अन्वये तक्रार नोंद करण्यात आली असुन पुढील तपासाची मा. न्यायालयाची परवानगी घेण्यात आली असुन पुढील तपास चालू आहे.
ही कारवाई पोलीस उप-अयुक्त साो, परीमंडळ ०३, शिवाजी पवार साते, पोलीस उप-आयुक्त गुन्हे शाखा संदिप डोईफोडे तसेच सहा पोलीस आयुक्त चाकण विभाग राजेंद्रसिह गौर, वरीष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट ०३ शैलेश गायकवाड व सहा. पोलीस निरीक्षक नितीन अंभोरे, प्रभारी निरीक्षक दिघी पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट ०३ पोलीस उपनिरीक्षक सुनिल भदाणे, पोशि २००१ नांगरे, पो. शि २२९६ जैनक दिघी पोलीस ठाण्याचे तपास पथकातील पोहा ७१३ चिंतामण फलके, पोहा ८०१ प्रदीप पोटे, पोहा १०२० किशोर कांबळे, पोशि ३५५३ उमेश कसबे यांनी केली आहे.
नियंयण कक्षास कुणीही खोटी माहिती देवुन पोलीसांना वेठीस धरु नये, अन्यथा कायदेशिर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी नागरिकांना दिला आहे.