न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ एप्रिल २०१९) :- प्रेरणा असोसिएशन फॉर दि ब्लाइंड व जितो चिंचवड-पिंपरी यांच्या वतीने दृष्टिहीन मुलींच्या क्रिकेट सामन्याचे आयोजन शहरात केले आहे.
पिंपरीतील आण्णासाहेब मगर स्टेडियमवर मंगळवार (दि. २३) रोजी सायंकाळी पाच वाजता दृष्टीहीन मुली व डोळस मुलींमध्ये हा सामना रंगणार आहे. शहरात प्रथमच अशा सामन्याचे आयोजन करण्यात आल्याचे प्रेरणा परिवाराचे सेक्रेटरी सतिश नवले यांनी सांगितले आहे.
या सामन्यासाठी मुंबई, पुणे येथील दृष्टिहीन खेळाडू सहभागी होणार आहेत. दृष्टीहीन व्यक्तींच्या व्यथा, वेदना व गरज यांची जाणीव व्हावी, यासाठी या विशेष सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे.











