न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ फेब्रुवारी २०२४) :- पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यक्षेत्रातील योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणाच्या कामकाजात आज सोमवारी (दि. २६) बदल करण्यात आले आहेत.
मोशीतील पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व कन्वेंशन सेंटर येथे दि. २४ ते २६ फेब्रुवारी या कालावधीत ‘महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो’ आयोजित करण्यात आला आहे.
याकरिता पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाची योग्यता प्रमाणपत्राच्या कामकाजाची जागा अधिग्रहित केली आहे. दि. २६ फेब्रुवारी रोजी योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणाचे कामकाज होणार नाही.














