न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ फेब्रुवारी २०२४) :- ज्योतीष जाणत असल्याचा बनवा रचला. बाईने करणी केल्याची भिती दाखवली. पुजेसाठी फिर्यादीकडुन १५,००० रुपये व त्यावेळी त्यांच्याकडे विश्वासाने सोपवलेली २०,००० रुपये किंमतीची सोन्याची अंगठी हातचालाखीने पुजेच्या सामानात न बांधता आरोपी घेवुन गेला.
हा प्रकार (दि.०९/०१/२०२४) रोजी सकाळी ११.३० ते १३.१५ वा.च्या दत्तवाडी, आकुर्डी येथे घडला. फिर्यादी सिध्दार्थ यशवंत सपकाळे यांनी अनोळखी इसमाच्या विरोधात फिर्याद दिली आहे. निगडी पोलिसांनी ६८/२०२४ भा.दं.वि. कलम ४०६, ४२०,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोउपनि सातपुते पुढील तपास करीत आहेत.















