न्यूज पीसीएमसी नेटवर्क
भोसरी (दि. २३ एप्रिल २०१९) :- “काँग्रेस कार्यकर्त्यांच्या सहभागाने व सहकार्याने आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे मोठ्या मताधिक्याने विजयी होतील” असा विश्वास विलास लांडे यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत व्यक्त केला.
या प्रसंगी बोलताना लांडे म्हणाले, काँग्रेस कार्यकर्त्यांचा योग्य सन्मान राखला जाईल. सर्वानी आपआपल्या बूथवर कामाला लागावे व मतदारांना संपर्क करून अधिकाधिक मतदान करवून घ्यावे. अमोल कोल्हे हे सर्वतोपरी सक्षम व उत्तम उमेदवार आहेत. त्यांचा जाहिरनामा ते निश्चितच विकासरूपाने साकार करणार आहेत. जातीयशक्तीना नाकारून जनता त्यांना स्वीकारेल. आपण कामाला कमी पडता कामा नये व काँग्रेस कार्यकर्ता विजय श्री खेचून आणेल याबद्दल खात्री आहे.
शिरूर लोकसभा मतदार संघाचे आघाडीचे उमेदवार डाॅ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ आज संभाजीनगर येथे सक्रीय काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक पार पडली.
या बैठकीस भोसरी मतदारसंघाचे माजी आमदार विलास लांडे, महाराष्ट्र काँग्रेस पर्यावरण विभागाचे अध्यक्ष अशोक मोरे, एन एस यू आय चे माजी अध्यक्ष मनोज कांबळे, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, महाराष्ट्र महिला काँग्रेस उपाध्यक्षा निगार बारस्कर, माजी नगरसेवक विश्वास गजरमल, शिक्षण मंडळाचे माजी सभापती अर्जुन ठाकरे व विजय लोखंडे, स्वीकृत सदस्य प्रकाश सोमवंशी, निखिल भोईर, किरण पवार, भोसरी युवक काँग्रेस चे अध्यक्ष नासीर चौधरी, हिराचंद जाधव, निळकंठ तागतोडे, दिलीप सिंह मोहिते, रशीद सिद्दीकी, विजय ओव्हाळ,आप्पा शिंदे, अनिल सोनकांबळे, दिनकर भालेकर, श्रीरंग सरपाते, उमेश बनसोडे, रोहन वाघमारे, सतीश भोसले व आदि पदाधिकारी व भोसरी मतदारसंघातील बहूसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.











