न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहू (दि. १० मार्च २०२४) :- देहु नगरपंचायतीचा थकीत मिळकत कर वसूल करण्यास आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या शासकीय कामात अटकाव करीत शिवीगाळ, दमदाटी करीत अंगावर धावून गेल्याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी दुपारी एकच्या सुमारास माळीनगर येथे घडली.
सागर धोंडीबा गायकवाड (रा. माळीनगर) यांच्या विरुद्ध देहु नगरपंचायतीचे कर संकलन प्रमुख ज्ञानेश्वर शिंदे यांनी फिर्याद नोंदविली आहे.
देहू नगरपंचायतीचे थकीत मिळकत कर वसूल करण्यासाठी कर विभाग प्रमुख ज्ञानेश्वर शिंदे, पाणी पुरवठा विभाग प्रमुख धनंजय नायकवडे, कर्मचारी आशा मोरे, अजय वाल्मिकी, दत्ता शिंदे, आसिफ शेख, प्रतीक चव्हाण, किरण झगडे, सुरेश खंडागळे आदींनी माळीनगर येथील सागर गायकवाड यांच्याकडे थकित असलेला मिळकत कर भरण्यास सांगितले. त्यावरून उपस्थित सर्वांसमोर कामात अटकाव करीत त्यांना शिवीगाळ केली.











