न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ मार्च २०२४) :- पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलात शिपाई पदाच्या २६२ जागांसाठी भरती केली जाणार आहे. ५ ते ३१ मार्च २०२०४ या कालावधीत ऑनलाइन माध्यमातून अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
याबाबत सविस्तर माहिती policerecruitment२०२४.mahait.org आणि http://www.mahapolice.gov.in या संकेतस्थळांवर देण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड शहर पोलीस भरतीमध्ये सर्वसाधारण उमेदवारांसाठी ७९, महिला ७८, खेळाडू १५, प्रकल्पग्रस्त १४, भूकंपग्रस्त चार, माजी सैनिक ४१, अंशकालीन पदवीधर ११, पोलीस पाल्य सात, गृहरक्षक दल १३ जागा असणार आहेत.
उमेदवारांना policerecruitment2024.mahait.org या संकेतस्थळावरून अर्ज करता येईल.