न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (२४ एप्रिल २०१९) :- भाजपा, शिवसेना, रिपाइं (ए), राष्ट्रीय समाज पार्टी, शिवसंग्राम, रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ खराळवाडीतील कामगारनगर येथे मंगळवार (दि. २३) रोजी शिवसेनेच्या वतीने जेष्ठ नागरिक, कामगार, उद्योजक व प्रभागातील नागरिकांमध्ये संवाद साधण्यात आला.
मावळ हा शिवसेनेचा गड राहिल्याने इथे बारणे १००% निवडून येतील, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला. तसेच संसदरत्न व उमेदवार श्रीरंग बारणे यांना प्रचंड बहुमताने निवडून देण्याचे आव्हान यावेळी शिवसेनेच्या वतीने करण्यात आले.
याप्रसंगी शिवसेनेचे आशिष तरडे, सोमेश चव्हाण, मोहन बाबर, संदीप जाधव, अनुजा शिंदे, वैशाली कुलथे, लोकेश कुमार, योगेश कोळंबेकर व आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.











