न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ मार्च २०२४) :- देहूरोड येथील ठाकरे गटाचे विभाग प्रमुख विजय थोरी यांच्या मुलाची काल मध्यरात्री निर्घृण हत्या करण्यात आली आहे. विशाल विजय थोरी असे या २३ वर्षीय मृत तरूणाचे नाव आहे. जुन्या भांडणाच्या कारणावरून ही हत्या करण्यात आली आहे. देहूरोड पोलीसांनी आरोपींना अटक केली आहे.
१) रोहन राजेश देशमुख (वय.२३ वर्षे, रा. विकासनगर, देहुरोड), २) सुयश विलास देशमुख (वय.२६ वर्षे, रा. सदर), ३) अमित कैलास वरगडे (वय. २४ वर्षे, रा. स्वराजनगरी, तळेगाव चाकण रोड, तळेगाव दाभाडे), ४) वैभव शिवाप्पा ओनी (वय.२० वर्षे, रा. स्वराजनगरी, तळेगाव चाकण रोड, तळेगाव दाभाडे) व त्याच्या साथीदारांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांना दाखल गुन्ह्यात तात्काळ अटक करण्यात आली आहे.
विशालची विशालनगर किवळे भागातील श्री साई दर्शन कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या जवळच अज्ञातांनी दगडाने ठेचून हत्या केली आहे. विशालचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पोलिसांना गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, विकास नगर येथे रात्री १ वाजण्याच्या सुमारास विशाल थोरी याच्यावर ४ ते ५ जणांनी हल्ला केला. विशालला काही कळण्याच्या आतच त्याच्यावर लाठ्याकाठ्यांनी हल्ला करण्यात आला. सिमेंटचा गट्टू व लाकडी बांबूने मारहाण करून त्याला जीवे मारण्यात आलं आहे.