न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ मार्च २०२४) :- आकुर्डीतील डी. वाय पाटील इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज येथे डी वाय पाटील आंतरराष्ट्रीय विद्यापीठ, पुणे यांच्याव्दारे आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्याबाबत फिर्यादी यांना आरोपीने भासवले. फिर्यादीकडुन एकुण ५,००,००० रुपये आरोपीने घेतले. परंतु त्यापैकी केवळ १,०२,००० रुपये फिर्यादी यांना परत दिले. उर्वरीत रक्कमबाबत वारंवार विचारणा करुन देखील आरोपीने सदरची रक्कम ३,९८,००० रुपये परत दिली नाही.
तसेच डी. वाय. पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी पुणे येथे टिईडीएक्स इसेंट आयोजित करणार असल्याचे सांगितले. तसा समजुतीचा करारनामा केला. त्याकरीता फिर्यादीच्या ओळखीचे इसम सिध्दार्थ किशोर गौर यांच्याकडुन एकुण १०,००,००० रुपये घेतले. परंतु त्यांचे पण काम करुन दिले नाही. सदरची रक्कम वारंवार मागुन देखील परत दिली नाही. इव्हेंटचे काम करणार आहे, असे फिर्यादी यांना भासवुन त्यांचा विश्वास संपादन करुन फिर्यादी व त्यांच्या ओळखीचे इसम यांचेकडून पैसे घेवुन इव्हेंटचे काम पूर्ण न करता विश्वासाघात करुन एकुण १३,९८,००० रुपयांची फसवणूक केली आहे, असे
फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि. १९/०७/२०२३ पासुन आजपर्यंत) डी वाय पाटील इंस्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, आकुर्डी येथे घडली. फिर्यादी डॉ. कुलदीप ओकांरसिंग चरक यांनी आरोपी शरद हेगडे (आयरिस ग्लोबल मिडीयाचे कार्यकारी अधिकारी) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. रावेत पोलिसांनी ९७/२०२४ भा. द. वि. कलम ४२०,४०६ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि चाटे पुढील तपास करीत आहेत.