- पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट चारकडुन धडक कारवाई; पाचजण ताब्यात…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ मार्च २०२४) :- धोकादायक पद्धतीने अतिविस्फोटक एटीएफ, जेट इंधनाचा चोरुन काळाबाजार करणाऱ्यांवर गुन्हे शाखा, युनिट-४ कडुन धडक कारवाई करण्यात आली आहे. १,६५,२०० रु. कि.चा मुद्देमाल जप्त करून ०५ आरोपी व दोन अति विस्फोटक एटीएफ / जेट इंधन टैंकर ताब्यात घेण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवड शहरामध्ये पेट्रोल / डिझेल / ऑईल यांचा चोरुन काळाबाजार होत आहे याबाबतची माहिती काढुन कडक कारवाई करण्यासंदर्भात पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी आदेशित केले होते. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. (दि. ०६) रोजी तळेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शाताई हॉटेलच्या बाजुला, रस्त्याचे कडेला सोमाटणे फाटा टोल नाक्याजवळ ही कारवाई करण्यात आली. या ठिकाणी काही इसम हे एटीएफ जेट इंधन टैंकर चालकाशी संगनमत करुन आर्थिक मोबदल्यामध्ये त्यांच्या टँकरमधुन एटीएफ/जेट इंधन काढुन चोरी करुन इंधनाचा काळ्या बाजारात वाढीव दराने विक्री करुन आर्थिक फायदा मिळवत होते.
जागामालक १) मंगेश सखाराम दाभाडे (वय ४२ वर्षे रा. भेगडे आळी, शनिवार पेठ, तळेगाव दाभाडे) २) ईलाही सैफन फरास (वय ४५ वर्षे रा. कलवड वस्ती मशिद जवळ फाळके चौक धानोरी पुणे) व टैंकरचा चालक ३) अनिल सतईराम जस्वाल (वय २८ वर्षे रा. राणीसरांग आजमगड, उत्तर प्रदेश) ४) अमोल बाळासाहेब गराडे (वय ३१ वर्षे रा. मुपो पिपंळ खुटे ता मावळ) ५) परशुराम उर्फ सोन्या धोंडीबा गायकवाड (वय ३६ वर्षे रा. दाभाडे वस्ती, च-होली खुर्द ता खेड जि पुणे) अशी अटक आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात १२०/२०२३ भा.व.वि. कलम ३७९,२८५, ५११,३४ सह स्फोटक पदार्थ अधिनियम १९०८ चे कलम ५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोउपनि शिंपणे पुढील तपास करीत आहेत.