- स्टर्लिंग हॉस्पीटलमधील घटना; एकजण अटकेत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ मार्च २०२४) :- ‘हॉस्पिटलमधे अॅडमिट असणाऱ्या आईवर योग्य उपचार का करत नाही व पेशंटजवळ नातेवाईकांना का थांबु देत नाही’ या कारणामुळे चिडुन जावुन दोघांनी महिला फिर्यादीसह त्यांच्या सहका-याना हाताने व लाथाबबुक्क्यांनी मारहाण शिवीगाळ केली. आरडाओरडा करुन जिवे मारण्याची धमकी दिली.
हा प्रकार (दि. ०७) रोजी स्टर्लिंग हॉस्पीटल समोरील मोकळया लॉबीमध्ये घडली. महिला फिर्यादी यांनी आरोपी १) महिला आरोपी, २) संदीप उत्तम जाधव यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
निगडी पोलिसांनी ९३/२०२४, महाराष्ट्र वैद्यकिय सेवा व्यक्ती आणी वैद्यकिय सेवा व संस्था (हिंसक कृत्ये व मालमतोची हानी किंवा नुकसान यांना प्रतिबंध अधि २०१० चे कलम ३ व ४, भादंवि क. ३२३.५०४.५०६-३४ प्रमाणे गुन्हा दाखल करीत एकाला अटक केली आहे. पोउपनि मुत्नाळे पुढील तपास करीत आहेत.


















