- मावळ, शिरूरच्या उमेदवारीबाबत अद्यापही सस्पेंस..
- बीडमधून भाजपकडून पंकजा मुंडेना संधी?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मुंबई (दि. १२ मार्च २०२४) :- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचा जागा वाटपचा पेच अद्याप सुटलेला नाही अशा चर्चा आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी मित्र पक्षांचा सन्मान करु असं म्हटलं आहे. तर दुसरीकडे शिंदेंना जितक्या जागा सोडाल तितक्याच आम्हालाही हव्या असा आग्रह अजित पवारांच्या राष्ट्रवादीनेही धरला आहे. त्यामुळे लोकसभेच्या ४८ जागांचा तिढा कसा सुटणार याच्या चर्चा रंगल्या आहेत. अशात रावसाहेब दानवेंनी भाजपाचे कुठले आणि किती उमेदवार ठरले ती यादीच वाचली आहे.
दरम्यान भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक सोमवारी नवी दिल्लीत पार पडली. या बैठकीत महाराष्ट्रातल्या लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला. महाराष्ट्र भाजपच्यावतीने केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत २५ जागांचे सादरीकरण केले गेले.
या बैठकाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, रावसाहेब दानवे हे महाराष्ट्रातील नेते उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासमोर महाराष्ट्रातील नेत्यांनी जागांचे सादरीकरण केले.
बैठकीत या नावांवर शिक्कामोर्तब झाल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती…
नागपूर – नितीन गडकरी
जालना – रावसाहेब दानवे
चंद्रपूर – सुधीर मुनगंटीवार
पुणे – मुरलीधर मोहोळ
सांगली – संजय काका पाटील
भिवंडी – कपिल पाटील
दिंडोरी – भारती पवार
बीड – पंकजा मुंडे


















