न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहू (दि. १४ मार्च २०२४) :- इंद्रायणी नदीच्या प्रदूषणात वाढ होत असून बुधवारी तीर्थक्षेत्र देहूगाव येथे विविध प्रकारचे सुमारे पाचशे मासे मृतावस्थेत आढळले.
मृत माशांमध्ये गोल्डन, महाशिर, शिवडा असा प्रजातींचा समावेश असून त्यांची लांबी साधारण साडेतीन फूट आहे. प्रदूषित पाणी नदीत सोडल्यामुळे हा प्रकार घडला आहे.











