न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ मार्च २०२४) :- चऱ्होली बुद्रुकचे ग्रामदैवत वाघेश्वर महाराज यात्रा मंगळवारी (ता. १२) उत्साहात पार पडली. या दिवशी चक्क एक नाग मंदिराच्या गाभाऱ्यात असलेल्या पिंडीजवळ येऊन बसला. भाविकांनी नागोबाचे दर्शन घेतले.
लाइफ प्रोटेक्शन अँड कंजर्वेशन ट्रस्ट संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विक्रम भोसले यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यांचे एक पथक मंदिरात दाखल झाले. सदस्यांनी नागाला पकडून सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडून दिले.
अशाच प्रकारे वाघेश्वर महाराज मंदिरात ५६ वर्षांपूर्वी ग्रामस्थांना नागोबाचे दर्शन झाले असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी महापौर नितीन काळजे यांनी दिली.











