न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ मार्च २०२४) :- विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान देण्यासाठी देहूगाव नजीकच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, येलवाडी येथे आठवडे बाजाराचे आयोजन करण्यात होते. यामुळे गावकऱ्यांनी मनसोक्त खरेदीचा आनंद लुटला.
विविध पदार्थांचे स्टॉल विद्यार्थ्यांनी भाजीपाला, खाऊ गल्ली, मिठाई, लिंबू सरबत, कलिंगड स्टॉल पाणीपुरी, भेळपुरी असे विविध प्रकारांची दुकाने लावली होती. येलवाडीतील ग्रामस्थांनी आठवडे बाजारात येऊन विविध भाजीपाला खरेदी करून खाऊ गल्लीचा स्वाद घेऊन विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणीत केला.
याप्रसंगी शिवसेनेचे अशोक खांडेभराड, पंचायत समितीचे माजी उपसभापती अमोल पवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रणजीत गाडे, सामाजिक कार्यकर्ते जीवन बोत्रे, उपसरपंच सुजाता गाडे, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत गाडे, मनीषा चौधरी, योगिता गाडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सागर गाडे, बाळासाहेब गाडे, प्रवीण गाडे, संदीप गाडे, विनोद गाडे, सुरेश देशमुख, सचिनगायकवाड, प्रकाश गायकवाड, कैलास गाडे, महाळुंगे केंद्राचे प्रमुख दत्तात्रय भालचिम, मुख्याध्यापिका अनिता पवार आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन भाऊराव पांडे यांनी केले तर बाळासाहेव गाडे यांनी आभार मानले.
शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणारे केंद्रप्रमुख भालचिम, नवनिर्वाचित मुख्याध्यापिका अनिता पवार, संदीप लगाडे, भाऊराव पांडे आणि किरण गायकवाड यांचा विशेष सन्मान करण्यात आला.