- पं. मोदी व पक्षप्रमुख ठाकरे यांना बळकटी देण्यासाठी, आढळराव यांना बहुमताने निवडून द्या – कामगार नेते
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ एप्रिल २०१९) :- शिरूर लोकसभा मतदारसंघ शिवसेना भाजपा रासप आरपीआय युतीचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र मजदूर संघटनेचे अध्यक्ष कामगार नेते इरफानभाई सय्यद (उपाध्यक्ष, भारतीय कामगार सेना महासंघ, महाराष्ट्र राज्य) यांच्या मार्गदर्शनाखाली माथाडी कामगार व असंघटीत क्षेत्रातील कामगार तसेच टाटा मोटर्स मधील कामगार यांच्या भेटी घेण्यात आल्या.
“पिंपरी चिंचवड ही कामगारनगरी म्हणून सर्वश्रुत आहे. अनेक असंघटीत-संघटीत कामगार या शहरात आपला उदरनिर्वाह करण्यासाठी स्थायिक झाले आहेत. या कामगारांनीही लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊन, आपला मतदानाचा हक्क बजावावा याकरीता कोपरा सभेचे आयोजन करण्यात आले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी शिवसेना भाजपा युतीचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांना सोमवार (दि. २९) रोजी धनुष्यबाणाच्या चित्रासमोरील बटन दाबुन, प्रचंड मतांनी निवडून आणावे व आपल्या खासदाराला पुन्हा आपले प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यावी, असे आवाहन इरफानभाई सय्यद यांनी प्रचार व कोपरासभेच्या माध्यमातून कामगारांना केले.
यावेळी महाराष्ट्र मजदूर संघटनेचे सभासद असणा-या टाटा मोटर्स ली. मधील हजारो माथाडी कामगारांनी “आमचा नेता आमची ताकद” हा नारा देत शिवसेनेचा विजय असो, अशा जोरदार घोषणा दिल्या. यावेळी शिवसेना जिल्हा संघटिका सुलभाताई उबाळे, शहर संघटिका आशाताई भालेकर, युवासेने चे सचिन सानप, शिवसेना व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते











