न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ मार्च २०२४) :- सीईआर पोर्टल वरुन सात लाख रुपये किमतीचे हरवलेले मोबाईल प्राप्त पिंपरी पोलीसांनी प्राप्त केले आहेत. जानेवारी व फेब्रुवारी २०२४ या २ महिन्यात सीईआयआर पोर्टलच्या माध्यमातून परराज्यातून १५ व राज्यभरातून ३५ मोबाईल ट्रेस करुन मूळ मालकांना परत करण्यात येणार आहेत.
बिहार, कर्नाटक, मालदा पश्चिम बंगाल, ओरिसा, राजस्थान, गुजरात, आंध्रप्रदेश, तेलंगणा, मध्यप्रदेश, जम्मु काश्मिर येथे हे मोबाईल ट्रेस झाले होते. कन्नड व तेलगू या भाषा बोलणारे पोलीस हवालदार धायगुडे यांनी कर्नाटक परिसरातून बहूतांशी मोबाईल यूजर यांच्याशी संपर्क केला.
तसेच पोलीस हवालदार दत्तात्रय निकम व पोलीस हवालदार शहाजी धायगुडे यांनी मागील वर्षभरात २५० पेक्षा जास्त मोबाईल प्राप्त करुन २५० मोबाईल मूळ मालकांना परत केले आहेत. तसेच जानेवारी २०२४ व फेब्रुवारी २०२४ या दोन महिन्यात ५० मोबाईल युजरकडून प्राप्त करुन घेतले आहेत.













