न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ मार्च २०२४) :- शिरुर लोकसभा मतदारसंघात शिवाजीराव आढळराव पाटील विरुद्ध शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे अशी लढत निश्चित मानली जात आहे.
त्यात महत्वाचे म्हणजे आज मंगळवारी (दि. २६) रोजी मंचर येथे अजित पवार यांच्या उपस्थितीत शिवाजीराव आढळराव पाटील हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत, असे खात्रीलायक वृत्त आहे. तब्बल २० वर्षानंतर आढळराव पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घरवापसी होत आहे.