न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ मार्च २०२४) :- बेकायदा बिगर परवाना ५०,००० रु किं चे ०१ पिस्तुल व २,००० रु किं चे ०१ जिवंत काडतुस स्वतःजवळ बाळगणाऱ्या तरुणांना पोलिसांनी जेरबंद केले आहे.
(दि. २५) रोजी रात्री ११.१५ च्या सुमारास थेरगाव गावठाण, कमानीच्या खांबाशेजारी, थेरगाव येथे ही कारवाई पोलिसांनी केली. माऊली ऊर्फ ज्ञानेश्वर सुबराव पवार (वय २३ वर्षे, रा. पवारनगर, थेरगाव, मुळ रा. वाटंमबरी, ता. सांगोला, जि. सोलापूर), २) अजय म्हस्के (रा. थेरगाव) असे अटक आरोपींची नावे आहेत.
दोघांवर वाकड पोलीस ठाण्यात ३६४/२०२४ भारताचा शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३,२५ महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७(१) (३) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोउपनि चव्हाण तपास करीत आहेत.