- महायुतीच्या उमेदवाराचं काम करणार – आ. सुनील शेळके…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८. मार्च २०२४) :- मावळ लोकसभेच्या जागेवर आजही आमचा दावा आहे. ती जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळावी असं आमचं म्हणणं आहे. महायुतीकडून अधिकृत उमेदवार जाहीर होत नाही. तोपर्यंत मी माझ्या पक्षाची भूमिका मांडणारच असं शेळके म्हणाले. आमदार सुनील शेळके हे माध्यमांशी बोलत होते.
पुढे ते म्हणाले, मावळ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोठी ताकद आहे. याकरिता आम्ही मावळ लोकसभेच्या जागेसाठी आग्रही आहोत. मात्र, अजित पवारांनी दिलेल्या आदेशाच स्वागत करून आम्ही महायुतीच्या उमेदवाराचं काम करणार असून त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचं शेळके यांनी म्हटलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत गेल्या चार महिन्यापासून मी भूमिका मांडत आहे. त्यामुळे मी कुठेही यु- टर्न घेतला नाही. मी माझे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या भूमिका नेत्यांपर्यंत मांडत होतो, असंही शेळके म्हणाले.