न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ मार्च २०२४) :- बँकेतुन पैसे काढल्याचे पाहुन दोघांनी फिर्यादीवर वॉच ठेवला. फिर्यादी यांनी गाडीत पैशांची बॅग ठेवली. हे पाहुन त्यांना पैसे खाली पडलेत, असे आरोपींनी खोटं सांगितलं.
फिर्यादीची नजर चुकवुन ३,००,००० रुपये असलेली सॅक बॅगसह दोघांनी चोरुन नेली, असे फिर्यादीत नमूद आहे. हा प्रकार (दि. २८) रोजी सकाळी १०.४५ ते ११.१५ च्या दरम्यान बँक ऑफ इंडिया, पिंपरी ब्रांच, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळया समोर, पिंपरी येथे घडला.
फिर्यादी राकेश सेवनदास पारवानी (वय ५२ वर्ष, रा. रहाटणी) यांनी आरोपी अनोळखी इसमाच्या विरोधात फिर्याद दिली आहे. पिंपरी पोलिसांनी २६५/२०२४ भा.दं.वि कलम ३७९ अन्वये अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि रायकर तपास करीत आहेत.