न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ मार्च २०२४) :- ब्राम्हणोली पुलाच्या शेजारील पवना धरण नदीपात्रात एक महिंद्रा थार गाडी बुडाल्याची घटना बुधवार (दि. २७) सायंकाळी ५ च्या सुमारास घडली आहे. मात्र यात कोणतेही जीवीतहानी झाली नाही.
पुलाच्या शेजारील नदीपात्रात येणार पर्यटक व नागरिक आपली वाहने घुवत असतात. वाहने धुवताना या ठिकाणी अशा अनेक घटना घडल्या आहे. मात्र, या ठिकाणी वाहने धुणारे व पर्यटकांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.
एखाद्याचा जीव गेल्यावरच प्रशासनाला जाग येणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. तसेच अशा हुल्लडबाज पर्यटकांवर व त्या ठिकाणी वाहने धुणाऱ्यांवर प्रशासनाच्या वतीने कठोर कारवाई करावी, या ठिकाणी सूचना फलक लावावे, अशी मागणी परिसरातील स्थानिक नागरिकांनी केली आहे.