न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ मार्च २०२४) :- शिवजयंती बंदोबस्ताच्या अनुषंगाने पोलीस (दि. २८) पेट्रोलिंग करीत होते. दरम्यान सोमव्दार कॉलनी, राहटणी येथील रियान सोसायटीलगत एक इसम थांबला असुन त्याच्या जवळ गावठी कट्टा आहे तसेच त्याने अंगामध्ये काळ्या पिस्ता रंगाचा हुडी असुन फिक्कट निळ्या रंगाची जिन्स पॅन्ट घातलेली आहे, अशी माहिती गुन्हे शाखा, युनिट १ च्या पोलिसांना मिळाली.
पोलीसांची चाहुल लागल्याने आरोपी पळुन जावुन लागला. त्याचा पाठलाग करून त्यास मोठ्या शिताफीने पकडले. सौरभ विकास साठे (वय २२ वर्षे, रा. राहटणी) असे आरोपीचे नाव आहे. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेस डाव्या बाजुस खोचलेला एक देशी बनावटीचा लोखंडी गावठी कट्टा मिळुन आला.
त्यास ताब्यात घेवुन त्याच्या विरूध्द बेकायदेशीररित्या शस्त्र जवळ बाळगल्या प्रकरणी भारतीय शस्त्र अधिनियमान्वये वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी हा पोलीस रेकॉर्ड वरील सराईत गुन्हेगार असुन त्याच्या विरुध्द खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.