न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिखली (दि. २६ एप्रिल २०१९) :- चिखली येथील नूर ए इमान सोशल तहेरिक (नीस्ट) आणि भोसरी विधानसभा निवडणुक कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने चिखली गावातून फेरी काढून मतदान जनजागृती मोहीम राबविण्यात आली.
मुख्य बस स्टॉपपासून फेरी सुरू झाली. रामदास नगर-पाटील नगर-चिखली गावठाण- मुख्य चौकात फेरीची सांगता झाली. मतदानाची शपथ घेऊन मतदान जागृती फेरी पुर्ण केली.
यावेळी नीस्टचे अध्यक्ष फिरोज शेख, इसाकभाई शेख, शिवाजी अंबिके, पिंपरी चिंचवड बार असोशिएनचे माजी अध्यक्ष अॅड. सुदाम साने, युवराज शाह, चिखली ग्रामस्थ तसेच भोसरी विधानसभा जनजागृती अधिकारी मनोज मराठे, क्षितिज शिंदे, गौतम इंगळे, मधुकर रासकर आदी उपस्थित होते.











