न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ एप्रिल २०२४) :- तळेगाव -चाकण महामार्गावर सत्यकमल कॉलनीसमोर गुरुवारी (दि.०४) रात्री अकराच्या दरम्यान मुंबईकडे जाणाऱ्या भरधाव ट्रेलरची चाके निखळून बसला धडकल्याने चाकण एमईडीसीमधील कामगार वाहतुकीच्या बसला अपघात झाला.
सुदैवाने बसमधील कामगार अगोदरच उतरलेले असलयाने विचित्रपणे झालेल्या या अपघातात बसचे नुकसान वगळता मोठा अनर्थ टळला. नेमका शेवटचा थांबा असल्यामुळे सुदैवाने बसमध्ये कुणीही प्रवासी नव्हते. मागे, पुढे इतर वाहने नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला. अपघातामध्ये बसची काच फुटून दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले असून, चालक किरकोळ जखमी झाला.
विशेष म्हणजे ट्रेलरची चाके निखळून पडली तरीही ट्रक चालकाला याबाबत काहीही कळाले नसल्याने तो न थांबता पुढे निघून गेला. अपघातामुळे तळेगाव चाकण महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.
—