- उत्कृष्ट रुणसेवा देणाऱ्यांचा होणार सन्मान…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ एप्रिल २०२४) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेची सर्व रुणालये व दवाखान्यांचे सर्वेक्षण होणार आहे. रुणसेवा अधिक सक्षम करण्यासाठी वैद्यकीय विभागाच्या वतीने त्यासाठी पाऊलउचलले आहे. या सर्वेक्षणानंतर ज्या रुणालयांनी तसेच दवाखान्यामार्फत उत्कृष्ट रुणसेवा दिली आहे त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
अल्प दरात तसेच मोफत उपचार होत असल्यामुळे महापालिकेच्या सर्वच रुणालयांमध्ये उपचारासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. त्यामुळे अनेकवेळा रुणांना सेवा देताना यंत्रणा अपुरी पडत आहे. अथवा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवर ताण येत आहे. वैद्यकीय विभागाच्या वतीने सध्या सर्वच रूग्णालयांमध्ये अत्याधुनिक साधन साम्रगी देण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता वैद्यकीय विभाग सर्वेक्षण देखील करणार आहे.
रुग्णालयात किती रुण उपचार घेतात, विविध शस्त्रक्रिया तसेच, महिला प्रसुतीचे प्रमाण किती आहे, किती रुण दगावले, रुण व त्यांच्या नातेवाईकांचे रूग्णालय व दवाखान्यांबाबत काय मत आहे. आदींसह विविध घटकांची सर्वेक्षणात पाहणी केली जाणार आहे.
रुणालये व दवाखान्यांची वर्षभराची कामगिरी तपासली जाणार आहे. सर्वोत्कृष्ट रुणालय व दवाखान्यांचा सन्मान केला जाणार आहे. महापालिकेचे यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालय, नवीन थेरगाव, नवीन भोसरी, आकुर्डी, नवीन जिजामाता, चिंचवडमधील नवीन तालेरा, मासुळकर कॉलनीतील नेत्र रुणालय, सांगवी, यमुनानगरअशी एकूण ९ रुग्णालये आहेत. तर, शहरात विविध ठिकाणी ३४ दवाखाने आहेत. रुणांना चांगल्या सेवा मिळण्यासाठी वैद्यकीय विभाग अधिक सक्षम करण्यात येत आहे.











