- वाकड पोलिसांकडून घटनास्थळी छापा; बारा जणांवर गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ एप्रिल २०२४) :- गुजरात टायटन्स विरुध्द किंग्स इलेव्हन पंजाबमधील चालु असलेल्या आयपीएल स्पर्धेमधील टी-२० क्रिकेट सामन्यावर वेगवेगळ्या बेटिंग अॅपव्दारे जुगार सुरु होता.
पोलिसांनी (दि. ०४) रोजी रात्री ११.१० वा. व त्यापुर्वी वाकड येथील मिलेनियम मॉलसमोर फ्लॅटमध्ये कारवाई केली. स्वतःच्या तसेच नागपुर येथील आरोपी क्र ११ व १२ यांनी नमुद क्रिकेट बेटिंग जुगार करिता ग्राहकाकडुन हार जित होणारा रकमेचा व्यवहार देवाण घेवाण करणेसाठी इतर इसमाच्या नावाने बनावट बँक खाते उघडुन क्रेडिट डेबीट तसेच क्रिकेट बेटिंगसाठी वापरण्यात आलेले एकुण ६,५८,००० रुपये किंमतीचे साहित्य पोलिसांनी जप्त केले.
याप्रकरणी सुनिल पांडुरंग काटे यांनी आरोपी १) सुर्यप्रताप कौशल्य सिंग, वय १८ वर्षे, रा. मु.पो.सत्ती, तालूका जिल्हासत्ती, छत्तीसगढ, २) राजेशछोटेलाल कुराबहु वय २५ वर्षे, मुपोरगजा, ता. सत्ती, जि. सत्ती, छत्तीसगढ, ३) रणजितसरजु मुखीया वय २० वर्षे, रा. पुनद, ता. घनशामपुर जि. दरभंगा, राज्यबिहार, ४) शुभम पुलसी धरू, वय२२ वर्षे, रा. तगदपुर, ता. जि. तगदपुर, छत्तीसगड, ५) तिलेश अमितकुमार कुरेह, वय २५ वर्षे, रा. रगजा, ताजि. सत्ती, छत्तीसगढ, ६) जितु नविन हरपाल, वय २८ वर्षे, रा. वॉर्ड नं.३१, शंकरनगर, रायपुर, छत्तीसगढ, ७) राहुलकुमार प्रकाश कुमार उराव, वय २२ वर्षे, रा. मु नंदेली, पो सोहटी, ता. जि सत्ती, छत्तीसगढ, ८) यश प्रसाद शाहु, वय १८ वर्षे, रा. वॉर्ड नं.३५१, टी.पी. नगर, जि. कोरबा, छत्तीसगढ, ९) किशन मनोज पोपटानी वय २२ वर्षे, रा. ए ४, गायत्री विहार, महाविर नगर, अमलेटी, जि. रायपुर, राज्य छत्तीसगढ १०) समया सुखदास महंत वय २६ वर्षे, रा. रोहदा, पोस्ट बंबनेडी, ता. जि. चापा, राज्य छत्तीसगढ. पाहिजे आरोपी – ११) कार्तिक ऊर्फ दिनेश आहुजा रा. नागपुर, १२) रामू बोमन रा. छत्तीसगढ यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. वाकड पोलिसांनी ४३२ /२०२४, भादवि ४२०, ४६४, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ३४ महाराष्ट्र जुगार कायदा कलम ४, ५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि जाधव तपास करीत आहेत.