न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ एप्रिल २०२४) :- चिंचवड येथील नॉव्हेल इंटरनॅशनल शाळेमध्ये शैक्षणिक वर्षाचा पहिला दिवस साजरा करण्यात आला. सर्व विद्यार्थ्यांचे जल्लोषपूर्ण स्वागत करण्यात आले. यामध्ये मुलांच्या मनातील उत्सुकता आणि कल्पनाशक्तीला वाव देणारे वॉल क्लाइंबिंग आणि बुल राईडचा विद्यार्थ्यांनी मनापासून आनंद लुटला.
मुलांच्या स्वागतासाठी नॉव्हेल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष अमित गोरखे, संस्थेचे कार्यकारी संचालक विलास जेऊरकर, शाळा व्यवस्थापक डॉ. प्रिया गोरखे, मुख्याध्यापिका मृदुला गायकवाड, तांत्रिक विभाग प्रमुख समीर जेऊरकर तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
मुख्याध्यापकांनी दहावीच्या विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले. नावीन्यपूर्ण उपक्रमांनी आणि शैक्षणिक मार्गदर्शनाने शाळा सर्व विद्यार्थ्यांच्या पाठीशी राहील, याची शाश्वती मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना दिली. हे विविध उपक्रम करताना प्रत्येक विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद दिसत होता. मुख्याध्यापिका मृदुला गायकवाड यांनी सर्व विद्यार्थ्यांचे मनापासून कौतुक केले.