न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० एप्रिल २०२४) :- चिखलीत गणेशनगर, सोनवणेवस्ती, रामदासनगर, चिखली या भागामध्ये अनेक लहानमोठे उद्योगधंदे असुन ब-याच वर्कशॉपमध्ये गाडयांचे पार्ट तयार करण्याचे काम केले जाते. दरम्यान (दि. ०४/ ते दि. ०५/०४/२०२४) रोजी सकाळी ०७.१५ वाजताच्या सुमारास प्रविण इंडस्ट्रीज, गणेश नगर, चिखली पुणे या कंपनीमधुन अज्ञात चोरटयांनी १,७५,५०० रुपये किंमतीचे गाडयांचे सुट्टे पार्ट तयार करण्याकरीता लागणा-या लोखंडी डायमिटरचा मुद्देमाल चोरुन नेला होता. याबाबत कंपनीच्या मालकांनी चिखली पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद नोदविली होत. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
चिखली पोलिसांच्या पथकाने परीसरातील सर्व बाजुने येणा-या जाणा-या रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यांना (दिनांक ०५) रोजी रात्री ०२.१० च्या सुमारास घटनास्थळावर एक मोटारसायकल व एक टेम्पो आल्याचे दिसुन आले. त्यामधुन आलेल्या इसमांनी कंपनीमधुन लोखंडी बार चोरी करून घेवुन गेल्याचे दिसुन आले. या टेम्पोचा नंबर झुम करुन पाहिला असता तो एम.एच.१४. जेएल.०४८२ असा असल्याचे दिसुन आले. लागलीच त्यांनी या नंबरच्या डिटेल्स पाहिल्या असता सदर टेम्पो आशिष गवळी (रा. पिंपरी गाव) असा होता. त्याच्याशी संपर्क केला असता टेम्पो मालक आशिष गवळी यांनी सुमारे १ वर्षापुर्वी सदरचा टेम्पो रामविलास यादव (रा. पुनावळे) यास विकल्याचे सांगितले. त्याप्रमाणे त्याच्या मोबाईल नंबरचे लोकेशन घेतले असता ते पुनावळे येथील आल्याने सदर ठिकाणी जावुन शोध घेतला. रामविलास यादव हा मिळुन आला. त्याचेकडे टेम्पो नंबर एम.एच.१४. जेएल. ०४८२ याबाबत विचारणा केली असता सदरचा टेम्पो त्याने अफझल युनुस मनियार यास दिला असल्याचे सांगुन टेम्पो आलम मनियार हा घेवुन गेला असल्याचे सांगितले.
त्याप्रमाणे पुनावळे भागात सापळा रचुन आरोपी १) आलम युनुस मनियार (वय ३३ वर्षे, राह. गायकवाडनगर, जी.के. रोज सोसायटीसमोर भंगार दुकानामध्ये, पुनावळे; मुळ राह. ग्राम ईश्वरदासपुर, पो.उचहा, एनटीपीच्या बाजुला, ता.जि. रायबरेली, राज्य उत्तरप्रदेश), २) जुबेर अब्दुलवहाब मेमन (वय २७ वर्षे, राह. गायकवाडनगर, जी. के. रोज सोसायटीसमोर भंगार दुकानामध्ये, पुनावळे पुणे मुळ राह. ग्राम याकुबपुरा, ता.जि. हैद्राबाद, राज्य आंध्रप्रदेश), ३) दिपक कपीलदेव तिवारी (वय २२ वर्षे, राह. गायकवाडनगर, जी. के. रोज सोसायटीसमोर भंगार दुकानामध्ये, पुनावळे पुणे मुळ राह. ग्राम मनकापुर, ता. तुलसीपुर, जि. बलरामपुर, राज्य उत्तरप्रदेश) यांना गुन्हयात वापरलेला टेम्पो नंबर एम.एच.१४. जेएल. ०४८२ याचेसह ताब्यात घेवुन तपास केला.
त्यांनी गुन्हयाची कबुली दिली असुन त्यांचे सोबत त्यांचे साथीदार पाहिजे आरोपी ४) अफझल युसुफ मनियार पत्ता माहीती नाही, ५) छोटु ऊर्फ शामलाल यादव पत्ता माहीती नाही असे असल्याचे सांगितले. वरील तिन्ही आरोपींना दाखल गुन्हयामध्ये अटक करुन त्यांचेकडुन गुन्हयातील गेलेला १,७५,५०० रुपये किंमतीचे लोखंडी डायमिटरचा सर्व मुद्देमाल व गुन्हा करताना वापरलेला टेम्पो हस्तगत करण्यात आलेला आहे. यांतील पाहिजे आरोपीत यांचा पोलीस शोध घेत आहेत.
सदरची कामगिरी शिवाजी पवार, पोलीस उपआयुक्त परिमंडळ ३, संदीप हिरे, सहा. पोलीस आयुक्त, भोसरी विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानेश्वर काटकर, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, चिखली पोलीस स्टेशन यांच्या अधिपत्याखाली सपोनि/श्री उध्दव खाडे, पोहवा / सुनिल शिंदे, पोहवा/बाबा गर्जे, पोहवा / चेतन सावंत, पोहवा / भास्कर तारळकर, पोहवा/संदिप मासाळ, पोहवा / दिपक मोहिते, पोहवा/अमोल साकोरे, पोना/अमर कांबळे, पोना/ कबीर पिंजारी, पोना/संदीप राठोड पोशि / संतोष सकपाळ, पोशि/संतोष भोर, पोशि/सातपुते यांनी यशस्वी रित्या पार पाडली आहे.