- ‘नागपूर-पुणे नागपूर’ सुपरफास्ट आता आठवड्यातून तीन दिवस धावणार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ एप्रिल २०२४) :- उन्हाळी विशेष ट्रेनमध्ये ‘नागपूर-पुणे नागपूर’ सुपरफास्ट आता आठवड्यातून दोन दिवस नव्हे तर तीन दिवस धावणार आहे. त्याबाबतचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला असून त्यामुळे उन्हाळी सुट्टीला पुणे-नागपूर-पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी फायदेशीर ठरणार आहे.
नागपूर ते पुणे सुपरफास्ट उन्हाळी विशेष (गाडी क्र. ०११६५) ट्रेन दि. १८ एप्रिल ते १३ जून दरम्यान प्रत्येक गुरुवारी आठवड्यातून तीन दिवस धावेल. एकूण ९ फेऱ्या होतील.
तसेच पुणे ते नागपूर सुपरफास्ट उन्हाळी विशेष (गाडी क्र. ०११६६) ट्रेन दि. १९ एप्रिल ते १४ जून दरम्यान प्रत्येक शुक्रवारी धावेल. या मार्गावरही एकूण ९ फेऱ्या होतीज. या गाडीचे थांबे आणि वेळेमध्ये कोणताही बदल नसून, येत्या १३ एप्रिलपासून या गाडीचे बुकिंग सुरू होणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.