न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ एप्रिल २०२४) :- अॅडव्हान्स ५०० रुपये फिर्यादी यांनी फेरीवाल्या महीलांना दिले होते. फिर्यादीच्या समोरील भंगाराच्या आरोपी दुकानदाराने भंगार त्या दुकानात का टाकले? अशी विचारणा फेरीवाल्या महीलांकडे केली.
दरम्यान आरोपी भंगार मालकाने लोखंडी सळई फिर्यादीला मारुन त्यांना जखमी केले. हा प्रकार (दि. १०) रोजी दुपारी ३.०० वाजता फिर्यादीच्या भंगार दुकानात, निघोजे-मोई रोडवर मोईगाव येथे घडला.
फिर्यादी मारुफ मकबुल खान (वय २९ वर्षे, धंदा भंगार दुकानदार) यांनी आरोपी श्रीराम यादव याच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी २३६/२०२४ भा.दं.वि कलम ३२६,५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून आरोपी अटकेत आहे. सपोनि कुथे पुढील तपास करीत आहेत.