न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ एप्रिल २०२४) :- हातात, कटर व लाकडी दांडके घेऊन आरोपी हा फिर्यादीच्या घरी आला. त्याने फिर्यादीला शिवीगाळ करून जोरात धक्का देत खिडकी उघडली. फिर्यादीला कटर व दांडके दाखवून ‘तुम्ही बाहेर या, आज तुम्हाला मारून टाकीन’ अशी धमकी दिली.
फिर्यादीने घाबरून दरवाजा उघडला नाही. तेव्हा आरोपीने फिर्यादीच्या दरवाजावर जोराने लाथा मारल्या. यापूर्वी फिर्यादीचा मुलगा आर्यन याला आरोपीने मारहाण केलेली होती. ती तक्रार मागे घ्या, असे बोलून तो नेहमी फिर्यादीवर दबाव आणत आहे व शिवीगाळ करून धमकावत आहे. तसेच फिर्यादीकडे पाहून विक्षीप्त हावभाव करून अश्लिल भाषेत शिवीगाळ केली आहे, असं फिर्यादीत नमूद आहे.
हा प्रकार (दि.११.०३.२०२४) भुमकरवस्ती, वाकड येथे घडला. महिला फिर्यादी यांनी आरोपी संदिप बबन भुंडे (वय ३८ वर्ष) याच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे. हिंजवडी पोलिसांनी ४७०/२०२४ भा.दं.वि कलम ४५२,५०९,५०४,५०६ (२) आर्म अॅक्ट ४ (२५) महा. पो. अधि कलम ३७(१) (३) १३५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि शेळके तपास करीत आहेत.