न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ एप्रिल २०२४) :- जेसीबीने जमीन लेवल करीत असताना आरोपी क्र १ ते ४ हे तिथे आले. फिर्यादीला ‘आमची जागा आहे, तु कसा काय लेवल करतोस’, असे म्हणत त्यांच्या उजव्या पायाच्या पिंढरीवर व डोक्याच्या उजव्या बाजुला, कानाच्यावर, लाकडी दांडक्याने मारुन दुखापत केली.
हा प्रकार (दि. १३) रोजी दुपारी ४.३० च्या सुमारास जाधववाडी, चिखलीमध्ये घडला. फिर्यादी अमर अशोक चांगभले (वय ३८ वर्ष, धंदा चालक) यांनी आरोपी १) विठ्ठल चव्हान २) गोकुळ चव्हान ३) आतीश चव्हान ४) गोकुळचा लहान मुलगा (पुर्ण नाव पत्ता माहीत नाही) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
चिखली पोलिसांनी २१६/२०२४,भा.द.वी.क. ३२४,५०४, ३४.अन्वये प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि देवकर तपास करीत आहेत.