न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ एप्रिल २०२४) :- हिंजवडी येथील “पुणे मेट्रो” च्या चालू असलेल्या प्रकल्पाला पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी आज भेट दिली. यावेळी वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त आणि मेट्रोचे प्रकल्प संचालक आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
पोलीस आयुक्तांनी मेट्रो मार्गाची पाहणी केली. ज्या ठिकाणी ओव्हरहेडचे काम पूर्ण झाले आहे, तेथे रस्ते रुंदीकरण आणि बॅरिकेड्स हटविण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. त्यामुळे वाहतूक सुरळीत होईल.
मेट्रोचे ६५ टक्के काम जवळपास पूर्ण झाले आहे. काही स्थानकांचे काम प्रगतीपथावर आहे. जेथे काम जवळपास पूर्ण झाले आहे तेथे मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी रस्ते मोकळे करण्याचे आणि बॅरिकेड्स आणि अवजड उपकरणे, मशिनरी हटवण्याचे आश्वासन दिले.