न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ एप्रिल २०२४) :- डुडा या अफु वनस्पतीच्या सुकवलेल्या बोंडांची ८२६ ग्रॅम १२,३९० रुपये किंमतीची चुरा पावडर (पॉपि स्ट्रॉ) आणि ५३,६०० रुपये किमतीचा १३४ ग्रॅम अफिम, असा एकुण ६५,९९० रुपये किमतीचे अंमली पदार्थ आरोपीने बेकायदेशिररित्या विक्रीसाठी जवळ बाळगले.
तसेच त्याच्याकडे २५,००० रु किं चा एक सॅमसग कंपनीचा मोबाईल व १५,००० चा विवो कंपीचा मोबाईल आणि ६०,००० रु किं ची एक लाल रंगाची एमएच १४ जी.टी. ०८४० हि होंडा कंपनीची अॅक्टीवा गाडी असा एकुण १,६५,९९० रुपये किंमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने (दि.२३) रोजी दुपारी ३.५५ वाजता निगडी पोलीस स्टेशन हद्दीतील ट्रान्सपोर्ट नगर येथील न्यु मालु ट्रान्सपोर्ट नावाच्या गोडाऊनजवळ रस्त्याच्या कडेला केली.
१) बलजिंदरसिंग जागरसिंग सोही (वय ५९ वर्षे, रा ट्रान्सपोर्टनगर, सोही चिमा ढाबा, प्राधिकरण, निगडी) आणि २) नसिब रुपचंद मिस्त्री (वय ४० वर्षे, रा. खराळवाडी, पिंपरी) यांना अटक करण्यात आली आहे.
त्यांच्याविरुद्ध निगडी पोलीस ठाण्यात २०८/२०२४ एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), १५ (अ), १७ (ब) व २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोउपनि मणेर पुढील तपास करीत आहेत.