न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० एप्रिल २०२४) :- निगडीतील मधुकर पवळे उड्डाणपूल परिसरातील रस्ता पालिकेच्या ठेकेदाराने विनापरवाना खोदून ठेवल्यामुळे नागरिकांना निगडी गावठाण व निगडी प्राधिकरण भागात जाण्यासाठी एक ते दीड किलोमीटर अंतरावर वळसा घालून जावे लागत आहे.
त्यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर झाली आहे. उलट्या बाजूने बाहेर जाण्याच्या प्रयत्न वाहनचालक करत असून त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे. महापालिका आयुक्तांनी रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी भाजपचे सचिन काळभोर यांनी केली आहे.